गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने समाजसेवेचा आदर्श: विक्रम सावंत यांच्याकडून उत्कर्ष आश्रमशाळेला ४००० वह्यांची मदत….!

               पुरंदर रिपोर्टर Live 

वाघळवाडी | विजय लकडे 

                   गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. याच गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाला सामाजिकतेची जोड देत वाघळवाडी येथील उत्कर्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत एक अत्यंत प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. कै. रमेश महादेव जाधव (मु.पो. परिंचे) यांच्या स्मरणार्थ  विक्रम  सावंत (खंडोबाची वाडी) यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष संभाजी  होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ४००० वह्यांचे वाटप करण्यात आले.

                    या उपक्रमामध्ये परिसरातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिक्षणोपयोगी साहित्य देऊन त्यांना शिक्षणात टिकून राहण्यासाठी मोठा हातभार लावण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले.



कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या संभाजी  होळकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाचा संधी मिळते. ही मदत ही केवळ वह्यांची नसून, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी टाकलेले पायाभरणीचे पाऊल आहे.”


या उपक्रमात सो. कारखाना संचालक शैलेश रासकर, लक्ष्मण गोफने, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष तुषार लोखंडे, ख.वाडी सरपंच संतोष धायगुडे , वाघळवाडी उपसरपंच तुषार सकुंडे सागर चव्हाण उदय लोखंडे, अतुल लकडे हर्षवर्धन जगताप विराज कोरडे  , तसेच संस्था अध्यक्ष अजिंक्य सावंत, मुख्याध्यापक बाळासाहेब मोटे शिक्षकवृंद व अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.


विक्रम सावंत हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रीय असून त्यांच्याकडून विविध शाळांमध्ये सतत अशा स्वरूपाची मदत पोचवली जाते. त्यांचे हे कार्य केवळ वैयक्तिक समाधानीतेसाठी नसून, सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवूनच सुरू आहे.


कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य सावंत यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, “समाजातील असे दानशूर हात जर अशा संस्थांशी जोडले गेले, तर शिक्षणाची गुणवत्ता व गरजूंना मदतीचा हात मिळण्यास वेळ लागत नाही. संस्थेच्या इतिहासात असे अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन सरकारी, निमसरकारी सेवांमध्ये यशस्वी कारकीर्द केली आहे.”


बाळासाहेब मोटे सर यांनी याप्रसंगी काही माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथाही सांगितल्या, ज्यांनी याच शाळेतून शिक्षण घेऊन समाजात नाव कमावले आहे.


                 हा उपक्रम फक्त वह्यांचे वाटप नसून, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ‘गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णु’ या तत्त्वाच्या सामाजिक अंमल हेबजावणीचे एक उदाहरण ठरले आहे. ही परंपरा पुढे नेण्याचा संकल्प करतच कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments